मराठी
५७२. ख्रिस्ताकरिता परिश्रम
येशूनावें खपुनी
सेवीं त्यांस झटूनि
येशू राही जवळी
आस कां सोडली ... १
येशू तुजला सहाय
तोच सुचवि उपाय
खपुनी त्यास विनवी
सुवेळी करी यशस्वी ... ध्रु
ये दुपारीं सत्वरी
रात्र येई तोवरीं
येशू कामीं लावितो
यत्नही तो पाहातो ... २
ये झटे पदे अंधार,
काळ काज संपणार,
प्रभूची भेट तू घेशीं
धन्य हि म्हणविशीं ... ३
------ एमिली आर. बिसल