५७३. प्रभातकाळ

मराठी

५७३. प्रभातकाळ जागल्या किती रे रात काहीं चिन्ह दिसतें यात्रिका, प्रभात ये ती, पहा, प्रकाशते जागल्या, ती दाखवी काय कैसें वर्तमान यात्रिका ती अर्पिती सद्भक्तांस श्रेष्ठ दान ... १ जागल्या, प्रभा चढे, तेज पाहीं, फांकतें यात्रिका पळे निशा, शांती सौख्य पोंचतें, जागल्या, प्रभा इथें एक ठायिं राहणार यात्रिका, दिगंतरीं सुप्रकाश पोंचणार ... २ जागल्या, पहा वरी, दिसतो अरुणोदय यात्रिका, सुदिन ये, संपले अं वारभय, जागल्या, निशा सरे, जा सुखे गृही अतां, यात्रिका हर्षा करीं, ख्रिस्त ये उद्धारितां ... ३ ------ एच. बॅलेंटाईन