मराठी
५७४. वाटसरूंचा अनुभव
वाटसरू चाललो,
कैक धक्के पावलो,
बंदरांस गांठणार
सुप्रभाती
नांगरांस टाकुनी
लहरांस टाळुनी
तीरीं पोचू येऊनि
सुप्रभातीं ... १
सदनी मिळणार
सुप्रभाती
माहेरीं नांदणार
सुप्रभाती
तैं एकत्र राहणार
रात्र नाही व्यापणार,
दिन नाहीं संपणार
सुप्रभाती ... ध्रु
बंधने जी तुटली
जडतील सगळी
मित्र मित्र ओळखी
सुप्रभाती
दिव्य वस्त्र लेउनी,
जयघोष गर्जुनी
हर्ष होई भेटुनी
सुप्रभाती ... २
आत्मे झाले मोकळे
सौख्यधामी तें गेले,
तात गेही जवळी
सुप्रभाती
केवी तैं उल्हासूनि
आम्ही पेंढ्या बांधुनी
टाकू ख्रिस्तचरणी
सुप्रभाती ... ३
जो प्रवास कंठितो
दुःख, कष्ट साहतों,
स्वर्गप्रांत गांठणार
सुप्रभाती
येशूराय पाहणार
हर्षनाद ऐकणार,
गोड, गोड लागणार
सुप्रभातीं ... ४
---- हेफसिबा पी. ब्रूस