मराठी
५७५. यात्रेकरूचा अनुभव
जागल्या सुदिनप्रभा
उदयास आली काय
जियोना येणारी शोभा
दिसे कोठें तिलप्राय
यात्रिका, पाहावें वरी
होतसे अरुणोदय,
सर्व शंका दूर करी
चालतां हो हर्षमय ... १
होय आतां प्रभा चढे,
उत्साहाची खून ती,
सारीं राज्यें ख्रिस्तापुढें
नमतील, भाकिती,
जागल्या तो पाहिला रे
दिव्य लोक हा खनान,
आकाशातुनि उतरे,
किती तो दैदिप्यमान ... २
यात्रिका तो मार्ग तुझा
पाहीं झाला तेजस्वी
ती उंचावलेली ध्वजा
जयकार सुचवि
करण्याच्या आवाजाने
भक्तजन उठणार
शोभेल अमरत्वाने
स्वर्गलोकी चढणार ... ३
जागल्या सुगंध वारा
आतां वाहू लागला,
ऐक त्या मंजुळ स्वरा,
देश जवळी आला,
एदेनाच्या सुशोभेनें
पाहा कैसा वेष्टिला
आले यात्रिक हर्षांने,
आतां मार्ग संपला ... ४
------- मेरी ई. बिसल