५७६. ख्रिस्तराज्यांतील यात्रेकरू

मराठी

५७६. ख्रिस्तराज्यांतील यात्रेकरू यात्रेकरी पहा कुणी वाटेने चालले, ते श्रमी, कष्टी दिसती, गरीब दुबळे ... १ प्रभूचे खासगीचे ते हर्षित नेहमी, जरी जगांत हलके तसाच व्हावा मीं ... ध्रु ते राजपुत्र सगळे वाटण शोधिती ते अविनाशी मुकुटा विश्वासें पाहती ... २ पामर दीन वस्त्रहीन ते दिसती लाचार येशूचे पुण्य आहे त्यां अदृश्य अलंकार ... ३ दरिद्री, अन्नावांचूनि भूकेले दिसती नाही ते तृप्त सर्वस्वी, ते मान्ना भक्षिती ... ४ टाकुनी ऐहिक सुखा का ऐसे फिरती सर्वस्वी नाश करी तें, म्हणुनी त्यजिती ... ५ संकट दुःख मनस्वी कां हे निवडीती ते ख्रिस्तमार्गी चालाया संतुष्ट असती ... ६ ज्या मार्गी मन रमते तैसा धरीत ना प्रभूच मार्ग, सत्यता, नील जीवना ... ७ ---- मेरी ई. बिसल