५७७. योबेल वर्ष

मराठी

५७७. योबेल वर्ष तुतारी वाजवा सर्व पृथ्वीवरी, उद्धार गाजवा, सांगा दिगंतरी मुक्तीचे वर्ष पोंचलें, ख्रिस्ताने पाप्या खंडिले ... १ ख्रिस्ताला स्तवुनी ती वर्णा कृपा थोर उद्धार साधुनी तो नाशी पाप घोर मुक्तीचे वर्ष पातलें, ख्रिस्ताने पाप्या खंडिले ... २ पापाचे बंदी दीन, मुक्ती पावाया या, हें त्यजा जग हीन, हा ख्रिस्त त्राता घ्या मुक्तीचें वर्ष पोंचले, ख्रिस्ताने पाप्या खंडिले ... ३ येशूपुढें नमा, तो तारिता महान, शुद्धी देऊनियां तो साधी सत्कल्याण, मुक्तीचें वर्ष पातलें, ख्रिस्ताने पाप्या खंडिले ... ४ ------- एच. बॅलेंटाइन