मराठी
५७८. उदयकाळ
प्रकाश फाकुनिया
निरसतो अंधार
राष्ट्रेही फिरुनियां
स्वीकारिती उद्धार
प्रत्येक वारयाने
हि वार्ता पोंचती,
कीं येशूवृत्ता हर्षें
भक्त प्रसारिती ... १
वरुनियां सदात्मा
सुवृष्टी करितो
प्रेरूनियां पाप्यांना
सन्मार्गी लावितो
सद्भक्त पित्यापाशी
विनंती करिता
तो ऐकतो आनंदे
दावितो ममता ... २
मूर्तीस पुजणारे
ती आतां त्यजिती
स्वच्छंदें चालणारे
शास्त्रज्ञा पाळिती
सर्वत्र मानिताती
येशूची प्रीति फार,
ते मागती, हजारो
त्याजवळी उद्धार ... ३
उद्धारनदी धन्य,
वाहे चॊहेंकडे
कधी फुलेल सर्व
हे रान कोरडें
सर्वत्र वाहुनियां
जीवन पुरवी,
कधी ना थांबुनीया
स्वर्गाला पोंचवि ... ४
----- एच. बॅलेंटाइन