५७९. सार्वभौम येशू

मराठी

५७९. सार्वभौम येशू लोकगर्जना एका, सागराचा शब्द थोर, अर्चना करुनिया गाती ईश्वरासमोर, गौरवा येशूराया, सर्वसत्ताधारी तो, हालेलूया गाउ या, सारीं राष्ट्रें शासी तो ... १ युद्ध आतां संपले खड्ग म्यानी घातिला, त्या ध्वजा गुंडाळिले, येशू जिंकिता झाला सर्व राष्ट्रे वैभवी वश्य त्याला पुरती, सार्वभौम गौरवीं येशू राजा वानिती ... २ तें प्रभुत्व येशूचे कोण केवी खुंटवि नष्ट होई विश्व तैं स्वप्रभावा वाढवी सांच शत्रुघ्न शोभे, जिंकी मृत्यूशत्रूला देवनंदना स्तवा, हालेलूया येशूला ... ३ ----- एच. बॅलेंटाइन