५८२. विवाहसमयींची प्रार्थना

मराठी

५८२. विवाहसमयींची प्रार्थना वधुवर राख सुखी, प्रभू, तारीं ... ध्रु प्रेम परस्पर वाढो, ह्यांचा निशिदिनी हो सहकारी ... १ आशीर्वादें सफल करीं ह्यां, संकट दुःख निवारीं ... २ तव सेवेला सकल जनां हीं कर उपयोगी, सुधारी ... ३ गोड करूनियां शेवट ह्यांचा हीं भवपार उतारी ... ४ शुभलग्ना ह्या सकल समाजा सुखदीर्घायु उभारी ... ५ -------- कृ. र. सांगळे