मराठी
५८३. विवाहसमयींचें शुभचिंतन
शुभ लग्न सावधान
पदे कर्णी प्रबोधन ... १
देवाजीची दिव्या वाणी
हा तों तिचा प्रतिध्वनी ... २
करी ज्याचा त्याचा वंश,
करी धर्म आणि देश ... ३
वधुवर अन्योन्यातें,
याच देती सूचनेते ... ४
शुभलग्न सावधान
करी संसार गर्जन ... ५
पुढें येणारी संतती
हेंच गर्जत पुढें होती ... ६
दास म्हणे सावधान
शुभ तयांचेच लग्न ... ७
---- ना. वा. टिळक