५८४. विवाहसमयींची प्रार्थना

मराठी

५८४. विवाहसमयींची प्रार्थना ईश्वरा, दयासागरा, दे वधूवरा वरा, जगदीशा, वरा, जगदीशा, तू पूर्व आपुली यांविषयीची आशा ... ध्रु दंपती अजून नेणती, शिरती भावपथी यांस सांभाळी, यांस सांभाळी, येतील पथीं संकटं, प्रभो ती टाळी सोपान मुक्तीचा साधा हा खरा संसार यांजला वाटो, ईश्वरा, हीं करोत हेतू , बापा, तव पुरा पाहिजे, प्रभो, यांस जे लेकरां तुझे सदा ते पुरवीं, सदा ते पुरवीं, जें नको यांस तें दूर, दयाळा ठेवीं ... १ अंतरीं आपुल्या घरीं तसा बाहिरी निधी सौख्याचा,निधी सौख्याचा, सहवास घडो यांप्रती ख्रिस्त येशूचा हीं दोन मनें उद्दाही जोडिली तव पायांवरती, देवा, घातली हीं तुझीच आता बापा जाहली, चालवी ह्यांस वाढवी, मधुर नचि नवी, फळे दे ह्यांना, फळे दे ह्यांना, ती बाघोन, जग हें करो तुझ्या गुणगाना ... २ ---- ना. वा. टिळक