५८५. लग्नाची वर्षतीथी

मराठी

५८५. लग्नाची वर्षतीथी ईश्वर सुख देवो सदोदित, तो तुम्हा उभयतां, इच्छित तुमचे पूर्ण जगिं होवो ...ध्रु प्रेमझरा वाहो निरंतर, हा प्रपंच अवघा प्रेमबलाने मुक्तिसम भावो संसारसिंधूचा नाविक तो एकला, ज्या नरावरी तो प्रसन्न प्रभू जाहला हा मत्सरलोकही स्वर्ग जणू त्याजला, त्याचें यश गावो सदोदित, हा येथे तेथे अभिन्न आत्मा तुमचा जय पावो ... १ ------ ना. वा. टिळक