मराठी
५८६. स्वागत
आलां आपण, प्रिय बंधूंनो,
प्रिय भगिनीनो, आपण आलां
सीमा नच हर्षास उरे,
भाग्य उदेलें आज खरे ... १
या हो या हो वाहो, वाहो
प्रेमाश्रूंचा पुअर आतां
ईश्वरचरणावर पुरता ... ध्रु
देवापुढतीं बसुनी बोलू
गाऊ, आनंदाने डोलू
येशू उभा राहील पुढें
बघू आपण जिकडे तिकडें ... २
अन्योन्यांचे सौख्य दुणावू ,
दुःख असे तरी वांटून घेऊं,
भिन्नपणा अवघा विसरुं,
समलेंन हें पूर्ण करुं ... ३
सांग प्रभूला अवघे हेतू
सोडून भीती, अभिमती. किंतु
घेऊं ठरवून पथ पुढचा
एक सदा तुमचा आमचा ... ४
जाता जाता अन्योन्यातें ,
हृदयी भरुनी घेऊं पुरते,
मग विरहाचें नांव नको,
देह हवा तितका भटको ... ५
------ ना. वा. टिळक