५८७. मंदिरसमर्पण

मराठी

५८७. मंदिरसमर्पण वंदन, बापा, तुजला करितों, जयजयकारें गगना भरितों राज्य तुझे आनंदाचें, प्रेमाचें सुखशांतीचें ... १ मंदिर तुज हे अर्पित करितो, भक्तजनाच्या कैवारी, प्रेमास्तव हें स्वीकारी ... ध्रु तव परिचर्या नित्य घडावी, तव सहवासीं वृत्ती रमावी, व्हावी येथें संस्तवने, मंगलगाने मधू भजने आत्मिक सत्य ग्रहण करावी, सत्प्रीती परिवर्धित व्हावी व्हावी अमुची शुद्ध मनें अर्पित तुजला पूर्णपणे ... ३ ख्रिस्ताचे अनुवर्तन व्हावें, नित्य तयाशीं युक्त असावे आकर्षावि मुक्ती पथीं पतितांची अतिदीर्घ तती ... ४ तव शुभवार्ता विदित करावी, विविधजनोद्धारक ती व्हावी, यास्तव आमुचें साह्य करी, नित्य कृपादाने वितरीं ... ५ तव सेवा संमंत्रणसमयी, तव आत्मा अध्यापक होई, वर ऐसा दे, विश्वपती, राहूं सदा त्वदधिन मती ... ६ ---- ना. वा. टिळक