मराठी
५८९. पाळकांची प्रतिष्ठापना
पाळक प्रतिनिधी येशूचा,
बंधू, सखा निजसंघाचा ... ध्रु
रक पितयासम त्याचा,
सेवक मातेसम साचा
रक पोषक,
सत्पथदीपक,
प्रधान याजक,
नायक अपुल्या लोकांचा
शूर शिपाई ख्रिस्ताचा ... १
पाळक योजी परात्पर
तयास पुरवी तोच कर
सुखदात्याला
सदय पित्याला,
प्रार्थू त्याला
निर्मल करुनि मन वाचा
रक्षि पाळक तूं अमुचा ... २
हृदयिं त्याच्या ख्रिस्त रतो
अक्षय जीवननिर्झर तो
पात्र तयाचे
पूर्ण झऱ्याचें
वहावयाचें
पाळक होवो हा अमुचा
जीवनदाता तृषितांचा ... ३
आधीं तुझा मग हा अमुचा
तूं सम्भरता उभयांचा
सदया देवा,
तुझीच सेवा
घडो, नसावा
गंध मना परहेतूचा
हीच सदा अमुची यात्रा ... ४
मनीं, जनीं हिंदीस्तानि
स्वाराज्याचा जयध्वनी
हेंच पुरे रे,
वैभव सारे
दुसरें वारे
नको स्पर्श आम्हां त्याचा
घे तुज तनमनधनवाचा ... ५
---- ना. वा. टिळक