५९१. दीक्षासमयीची प्रार्थना

मराठी

५९१. दीक्षासमयीची प्रार्थना तुझा हस्त अति मंगल, देवा, पावन करितो पतिताला, पुनरपि वितरी स्पर्श ज्याचा जीव कुडीतूनि हो गेला, सौंदर्यातें निर्मुनी ज्याने दिधली शोभा जगताला, त्या तव हस्तें, सदया बापा, दीक्षित कर या दासाला ... १ जगताच्या अघतमा हराया पूर्वाचलीं रवी जो आला नाम तयाचें ख्रिस्त येशू तो प्रसन्न करितो चित्ताला, तेजाची, प्रेमाची त्याच्या बीजें नव पेरायाला मानवहृदयी गाढ तमोमय, दीक्षित कर या दासाला ... २ पॉलपेत्रा लावियलें जे गोड वेड ते तूं याला लाव, विभो, ख्रिस्ताचें सगळें देई यातें धैर्याबला बापा, पुत्रा, पवित्र आत्मन, देवा त्रिविधैक्या, तुजला विनंती करिती दिन बालकें, दीक्षित कर या दासाला ... ३ ---- भा. कृ. उजगरे