५९२. पाळकाची प्रतिष्ठापना

मराठी

५९२. पाळकाची प्रतिष्ठापना स्तवन तव करीतसों, गुणनिधे हे मह्तीपते, सुखकर मंगलप्रद प्रकट जें स्वभक्त हितकर ... ध्रु मन योजी ज्या सत्संसंकल्प वितरिसी आशीर्वचा तयांवरी स्वरूप सुरुचीर धरिती ते तरी ... १ स्वरूपीं त्या प्रभू जनपद सेवा घडूनि भक्तजना लाभावा शुभकर अतितर तव सेवावर ... २ भजकगण नियोजिती तव कार्या सज्जन सेवक पालक तरी त्या मान्य करा, द्या प्रसाद भरपूर ... ३ पालक मंडळी परस्परांचा सुखद समागम परिवर्धित करुं सेवाबल, तव राज्यी सुखकर ... ४ पालकवर, प्रभू येशू ख्रिस्ता, छत्र दयेचें नित्य अम्हावरि धरुनी निजपथी चालवीं निजकरी ... ५ ------ वि. का. कोशे