मराठी
५९३. दीक्षा घेणाऱ्याचे विचार
प्रभू, तुझ्या हाती देह आणि जीव,
सांभाळ हि ठेव तुझी तूंच ... १
पाहिजे तो करी हिचा विनियोग,
पाहिजे तें सांग काम आतां ... २
तूंच सांगणारा, तूंच करणारा,
मी तों सर्वभारावेगळाच ... ३
न्हवे मी, सर्वत्र माझ्यांतला ख्रिस्त
पुरे हि प्रचित एवढीच ... ४
दास म्हणे, हीच खरी खरी दीक्षा,
इतर परीक्षा दुर्दैव्याची ... ५
ना. वा. टिळक