मराठी
५९४. विवाहसमयींची प्रार्थना
हे सुवंद्य देवा,
करीतोंचि सेवा,
लग्नकार्या द्यावा
आशीर्वाद
तुझे लोक धन्य
थोर आत्मजन्य,
त्यांस आज मान्य
दे प्रसाद ... १
दे वधूवराला
सौख्य, उल्हासाला,
पावती जयाला
ऐसें होवो,
तो करो सांभाळ,
प्रिय द्राक्षवेल
ती अमोल फळ
रम्य देवो ... २
रोप मोलवान
तसलें संतान
श्रेष्ठ तुझे दान
द्यावें त्यांस
नित्याचें तें अन्न,
आयुष्य संपन्न,
दे, प्रभू प्रसन्न
सुखरास ... ३
रोज होवो भक्ती
शेवटीही मुक्ती
पाळु दे आसक्ती
शास्त्राविधी
होतां भवदुःख
पाठवीं सत्सुख,
डाव तुझें मुख,
कृपानिधी ... ४
---- एस. बी. फेअरबँक