५९५. विवाहसमयीची प्रार्थना

मराठी

५९५. विवाहसमयीची प्रार्थना हे नेत्या, पूर्णा, तकार्तिता प्रेमा, लिनमनें हि तूंतें प्रार्थना, तूं ज्यांना जोडिलें दे त्यांना आतां ती प्रेमबुद्धी जिला अन्त ना ... १ दे दे ती श्रद्धा जी बाळांच्या ठायिं, हे नित्यानन्तआ, पूर्णा जीवना, दे दे औदार्य, त्या आशेला देईं जी थांबेना केव्हां कोठे कोणा ... २ हे पूर्णआनंदा दे त्या आनंदातें प्राप्य जेणें संसारा स्वर्गता, दे शांती यांचे, दे यांना श्रेयातें, तूं यांचा त्राता, तूं संगोपिता ... ३ ---- ना. वा. टिळक