५९६. विवाहसमयीची प्रार्थना

मराठी

५९६. विवाहसमयीची प्रार्थना प्रभू ख्रिस्ता तूं कृपेने लग्ननेम लाविला येऊनि आता दयेनें आशीर्वाद दे आम्हा नौरानौरी या दोघांना तुझी कृपा दाखवीं, क्षेम दे उभयतांना, तें अखंड वाढवी ... १ तुझी कृपा पावतांना हीं वंदोत तुझें नाव, सुमार्गात चालताना दाखवोत प्रेमभाव प्रिय प्रभू , तूं दयाळा करीं यांची बेगमी. दे आरोग्य, हे कृपाळू, दुःखें वारीं नेहमी ... २ रोज रोज त्यांच्या घरीं स्तुती, भक्ती होवो फार, तुझी कृपा झाली तरी हीं मानोत उपकार भवदुःखें लागतांना करीं त्यांचा तूं निभाव, ते आधार मागतांना वेगें होऊ दे बचाव ... ३ अंतकाळीं बोलावूनि करिशी त्यांचा वियोग, तेव्हां पुन्हा मिळवुनी वर्ते दे सत्सुखभोग प्रिय प्रभू ममताळू, दे भक्तीची भावना, स्तवु तुला, दे दयाळू , गाऊं तुझी करुणा .... ४ ----- एच. बॅलेंटाइन