मराठी
५९७. वियोगसमयीचे उद्धार
प्रभू असू तुजजवळी
ठेवुनी स्वपंखाखाली,
राखू या वियोगकाळी
प्रभू असू तुजजवळी ... १
तुजजवळी मिळू तोवरीं
प्रभू असू तुजजवळी
ख्रिस्तचरणी मिळू तोंवरि
प्रभू असू तुजजवळी ... ध्रु
प्रभू असू तुजजवळी
भवदुःखें घेरिताती
प्रेमें धरू तुला हाती
प्रभू असू तुजजवळी ... २
प्रभू असू तुजजवळी
तुजवरी होवू छाया,
सारीं विघ्ने निवाराया
प्रभू असू तुजजवळी ... ३
प्रभू असू तुजजवळी
थोर तव तो कैवारी,
ठेवूं सुखी मार्गावरी,
प्रभू असू तुजजवळी ... ४
---- मेरी ई. बिसल