मराठी
५९९. स्वतंत्र भारत अमुचा
गर्जेल गर्जना धन्य
हि हिंदभूमी जगमान्य ... ध्रु
स्वातंत्र्य रवी उदयेला
नवतेज चढे क्षितिजाला
डौलाने डुलतो येथे
तीनरंगी झेंडा अपुला
नवहिंद करी जयघोष
नवखंड घुमे नादाला
स्वातंत्र्य करी जयघोष
उत्साह वारी जयघोष
आनंद मनीं जयघोष गर्जेल ... १
हा स्वतंत्र भारत अमुचा
कोहिनूर भूदेवीचा
सौंदर्य तयाचें थोर
हा अलंकार जगताचा
ज्या पाहून दीपलें विश्व
जय हिंद देश हा अमुचा
या नावें गीत गायाला
स्फुरतसे स्फूर्ती चित्ताला
हा प्रणाम अर्पू तिजला गर्जेल ... २
हिमराज उंच हा भारी
गाईल यशाची गाणी
हा प्रचंड सरिता ध्याती
सेवेची सुंदर गाणी
हि जनताबाला प्रभूची
राही न आता भवरानी
संरक्षी देवा हिजला
दे दान नवें नित्याला
राहूं दे कृपाछत्राला गर्जेल ... ३
----- सु. धों. रामटेके