६००. अमुचा भारत

मराठी

६००. अमुचा भारत कुठे कशाची वाण कुणाला कुठे कशाची वाण हा प्रचंड भारतदेश आम्हाला वैपुल्याचि खाण ... ध्रु निसर्ग दाणे अपरंपार पर्वत इथलें जगांत थोर नद्या भिजवती सर्व शिवार हवा येथली छान खरोखर, हवा येथली छान हा प्रचंड भारत देश आम्हाला वैपुल्याचि खाण ... १ हृदयाची तर थोरी न्यारी इथेंच भरली दौलत सारी पांच खंड नादते तुतारी त्यागाचे महिमान सांगते त्यागाचे महिमान हा प्रचंड भारत देश आम्हाला वैपुल्याचि खाण ... २ सुखांत नंदू, सुखांत वाढूं बांधुप्रीतीचें बंधन जोडू द्वेष दुही कायमची धाडूं जगिं भरू नवप्राण हा प्रचंड भारत देश आम्हाला वैपुल्याचि खाण ... ३ प्रीतीनाम ईश्वररास देऊ प्रिय प्रभू येशू जागुनी दावू ह्या राष्ट्रांस्तव प्राणही वाहूं करुं सुवार्तादान अखंडित करू सुवार्तादान हा प्रचंड भारत देश आम्हाला वैपुल्याचि खाण ... ४ भेद मुळी नच कुठला उरला अमुचा भारत स्वर दुमदुमला आम्ही बांधव जपू मंत्राला मंगल हा अभिमान खरोखर मंगल हा अभिमान हा प्रचंड भारत देश आम्हाला वैपुल्याचि खाण ... ५ ----- स. ना. सूर्यवंशी