मराठी
६०१. स्वदेशप्रीत्यर्थ प्रार्थना
प्रियकर हिंदीस्थान अमुचा
प्रियकर हिंदीस्थान ... ध्रु
हीच सुखाची सौभाग्याची,
सर्व गुणांची खाण खरोखर
सर्व गुणांची खाण,
सर्व गुणांची खाण,अमुचा ... १
चिंता ह्याची करू सर्वदा,
ह्याचा धरू अभिमान, खरोखर
ह्याचा धरू अभिमान,
ह्याचा धरू अभिमान,अमुचा ... २
देऊ धनाला, देऊ मनाला,
ह्यास्तव देऊं प्राण, खरोखर
ह्यास्तव देऊं प्राण ,
ह्यास्तव देऊं प्राण, अमुचा ... ३
स्वदेशसेवा रुचे न तो नर
देह जसा निष्प्राण, खरोखर
केवळ तो निष्प्राण,
तो नच ख्रिस्ती जाण, अमुचा ... ४
प्रिय देशांचें अमुच्या देवा,
नित्य करीं तूं त्राण, खरोखर
नित्य करीं तूं त्राण,
नित्य करीं तूं त्राण, अमुचा ... ५
------ ना. वा. टिळक