६०2. स्वदेशप्रीत्यर्थ प्रार्थना

मराठी

६०2. स्वदेशप्रीत्यर्थ प्रार्थना प्रियकर हिंदीस्थान अमुचा प्रियकर हिंदीस्थान या प्रियभूमीस्तव ख्रिस्तपदि मीं वाहून बसलो प्राण ... ध्रु हि ज्ञानाची खाण खरोखर हि ज्ञानाची खाण परी येशूवांचून कोण उद्धरी सर्व हितंलें ज्ञान ह्या नाना जाती घेऊन आत्मोदरी अद्वितीय ह्यांचा राष्ट्रपुरुष जी करी अशी कोण माउली त्याविण ह्या भूवरीं हारवलें महिमान तुझें गे, हारवलें महिमान प्रिय जन्मभूमी, तें पुन्हा मिळवुनी देणारा तो जाण ... १ दे, दे देवा मान पित्याचा, दे दे देवा मान तूं मनुष्य तेथून अनधर्य रत्नें या पितयाचि मान तूं डाव जगाला आत्मयज्ञा तो कसा, निजवृत्तें कर गे स्वर्ग जगाचा जसा तूं महान सकलां, या माझ्या चरणीं बसा तुझें गुरुचें स्थान खरोखर, तुझें गुरुचें स्थान प्रिय जन्मभूमी, तूं ख्रिस्तरूप हो, सोड गडे अभिमान ... २ ----- ना. वा. टिळक