मराठी
६०३. देशहितार्थ स्वतःला वाहून घेणें
सदया, दे दे हें मजला ... ध्रु
निजदेशी मीं नयनीं बघावें
राज्यपदीं तुजला ... १
जिकडे तिकडे जयध्वजा
तव शोभा, अति विमला ... २
ख्रिस्ता, तुझिया राज्यी
माझा देश दिसो पहिला ... ३
सांभाळी मज, ह्या सेवेला
देहजीव दिधला ... ४
---- ना. वा. टिळक