६०५. राष्ट्राकरितां प्रार्थना

मराठी

६०५. राष्ट्राकरितां प्रार्थना भो परमेश्वर करुणासागर, जगदीशा सकाळ शुभाकर देवा ... ध्रु अमुच्या प्रियकर जन्मभूमीते यशसुख अक्षय दे दे बलजय वारून अरिभय ... १ प्रधान, अध्यक्षादि सेवकां सत्पथदर्शन बलसंवर्धन दे संरक्षण ... २ नातें अमुचे अन्य जनांशी प्रेमळ मधुतर संवर्धित कर प्रेम निरंतर ... ३ स्वातंत्र्याची शुभा देणगी तव प्रभुराया नम्र जना या स्तवु तव पाया ... ४ -------- ना. वा. टिळक