६०८. स्वदेशार्थ प्रार्थना

मराठी

६०८. स्वदेशार्थ प्रार्थना प्राप्त हो मला दया जी तुझी, जगद्धवा, प्राप्त होऊ माझिया तीच देशबांधवा सांग काय मी करू सिद्ध मी करावया, सांग काय मी मरुं जन्मभू तरावया ... १ शून्य मी स्वयें मला मोल कांहींहि नसे, मोल शून्य राशीला अंक मात्र देतसे तूंच ये घरीं करीं ने मला जनान्तरी, थोडकी कशी तरी घे करून चाकरी ... २ धर्मभूमी हि खरी हिंदभू धरेवरी, तूं हीच प्रभू जरी स्वर्गतुल्य हि तरी सांग काय मी करूं सोडूं काय वा धरुं केवीं हि तुझी करूं हिंदभू , जगद्गुरू ... 3 ---- ना. वा. टिळक