मराठी
६०९. नववर्ष
या स्तवा, प्रभूला स्तवा
दिवस सोन्याचा
हा आज लाभला नवीन वर्षाचा ...ध्रु
हा काळ सिंधू विकराल
नित्य खळबळला,
नाच दया कुणाची बिंदुमात्र ह्याला ... १
किती वार वाटले ठार
जाहलों आता,
किती वार धावला प्रभू जगतत्रात्ता ... २
हे स्मरा, जयोत्सव करा
नसे हो भीती,
जरी प्रभूच्या पायी खरी खरी प्रीती ... ३
ती प्रीती, खरी ती प्रीती
जिला मी नाही,
परी अवघे मीपण प्रभुंत जी पाही ... ४
---- ना. वा. टिळक