६१०. नववर्षस्तवन

मराठी

६१०. नववर्षस्तवन जयजयकार करूं, चला हो जयजयकार करूं ... ध्रु परमेशाचें प्रेम जाणुनी गत दुःखें विसरूं ... १ गतवर्षाचें ढेंवें दिधले अनुभव नित्य स्मरु ... २ नवं संवत्सर आला तरी या आशा नव्य धरूं ... ३ सर्वदशान्तर टाळून ख्रिस्ती नित्य नवत्व वरू ... ४ ख्रिस्तासंगे इहलोकाचा सुखद स्वर्ग करुं ... ५ जयगीतांही हृदयें अपुली पृथ्वी, व्योम भरू ... ६ ---- ना. वा. टिळक