. नववर्षस्तवन

मराठी

६११ . नववर्षस्तवन अजि दिन हा पाहुनिया बहू चित्ती हर्षलो, अनुरागें परेशाच्या येथवरीं पातलो, रक्षियेलें वर्ष सारे, उपकारी जाहलों, स्तवु त्यासी काय आम्ही अविचारें वर्तलो ... १ वर्षी या कृपादाना अगणितां, वर्षिलें बहुविधही स्थलामाजीं नवमार्गां दाविले, बहुतांशी मुक्तिदाना तारुण्यी दिधलें, ऐसें या मंडळीला सामर्थ्य प्रापिले ... २ या आतां समर्पाया सुखकंदा वंदने, प्रार्थू या ख्रिस्तराया तोडाया बंधने शुद्धात्मया तारणाच्या मार्गा हे अंध ने, अखिलातें जणाशी तूं , त्रेयका, हे मागणें ... ३ ----- सु. वि. करमरकर