६१४. नववर्षोत्सव

मराठी

६१४. नववर्षोत्सव जन हो, जयजयकार करा, नवंवर्षोदय झाला हर्षें परमेशाला स्मरा ... ध्रु धरितो कालतरुं सुंदरा धृतानंतशाखांप्रती भूषण रूप नवीनांकुरा ... १ स्मरुनी प्राप्त विभवनिकरा समजा आशानिधान आलें चालून हें मंदिरा ... २ आले अनुभव नच विसरा, परी सिंहासम मुरडून मागें पाहून पुढतीं सरां ... ३ अद्वय गुरु सखा जो नरा उद्धारक तो एकच येशू , त्याचा हात धरा ... ४ ---- ना. वा. टिळक