६१५. नवंवर्षंस्तवन

मराठी

६१५. नवंवर्षंस्तवन हि कालतरुवर नूतन कलिका फुलली, हि दिसे रसें थबथबली, पाहतां वाट हो कसली माधुरी घ्या खरी म्लान जॉन न जाहली ... १ हि कालतरुवर नूतन कलिका फुलली, हि कुणा विषारी दिसली, प्रभुकरिं तरी ती रमली, हि सुधा या, मुधा भ्रांती नाही चांगली ... २ हि कालतरुवर नूतन कलिका फुलली, हि असे खरोखर अपुली, ईश्वरें आपणा दिधली, चिंतूनि त्या मनीं, व्हा, इच्यांतले अली ... ३ ---- ना. वा. टिळक