६१६. नववर्षदिनीं समर्पण

मराठी

६१६. नववर्षदिनीं समर्पण निरवधी हा काल धावे, थांबेना क्षणभरी, सबलाची दुर्बलाची पर्वा हा नच करी अंकित हा परी ज्याचा त्या एका ईश्वरा, प्रिय जन हो, नमा, त्याचिं संस्तवनें या, करा ... १ देवा, तूं वर्ष आम्हां दाविलें हें नवें, कोणाला प्रेम तुझें दिनाला वानवें हे बापा, वर्ष तुझें तुजला हें अर्पितों, त्यासंगें देह आत्मे तव पायिं ठेवितों ... २ ---- ना. वा. टिळक