मराठी
६१७. नववर्षस्तवन
नववर्ष लाधलें, हर्ष करा, सुखवर्ष
तुम्हावर होवो, वर नवे नवे
ह्यापुढें परात्पर देवो ... 1
घटी पळें मिळून जोडिलें
आयु आपुले
असें नच समजा, परी कृती सकल
जाहल्या विचारें मोजा ... २
येशूची धर्मभानूची संगती शुचि
धरा मग काही
तुम्ही अमर, तुम्हाला जगांत भय नाहीं ... ३
---- ना. वा. टिळक