६१८. नव्या वर्षाची प्रार्थना

मराठी

६१८. नव्या वर्षाची प्रार्थना आधी आम्हाला वांकीव, पुढें व्हावें तें शिकिव ... १ कसें आयुष्य मोजावें तुझ्या आत्म्याला हें ठावें ... २ तोच, बापा, आम्हां व्यापो जिणे आमुचें हें मापो ... ३ माप रात्रंदिवसाचें किंवा केलेल्या कर्माचें ... ४ सांग कोणते उचलावें जिणे तूतें मापून द्यावें ... ५ दिधल्याचें काय झालें तुवां पाहिजे पाहिलें ... ६ तेव्हां देशील पुढचें दान, देवा अक्षयतेचें ... ७ दास म्हणे, जिणे माझें तुझ्या आत्म्याविण ओझें ... ८ ---- ना. वा. टिळक