६१९. गतवर्ष आणि नवें वर्ष

मराठी

६१९. गतवर्ष आणि नवें वर्ष कालग्रंथातलें हें भयंकर लिहूनी संपले एक पृष्ठ, हि इर्षा, वैर हें हा विजय, अजय हा, हे उभे हर्ष, कष्ट हें येथें रक्त, येथें अगणित पडले अश्रुचे डाग याला यांतोनि अर्थ याचा तुजविण कळणे सांग, देवा, कुणाला ... १ कालग्रंथातलें हें उघडून पुढतीं ठेविशी पृष्ठ कोरे, बापा, यामाजी आतां भयंकर असले काहीं मांडू नको रे, झालें दुस्वप्न याचा शुभमय, सदया, अर्थ लाधो पहाया हाती तुझ्या तुझीं ती कसलीहि असली लेकरे, देवराया ... २ ---- ना. वा. टिळक