६२१. आयुष्याची क्षणभंगुरता

मराठी

६२१. आयुष्याची क्षणभंगुरता आयुष्य वेगें पळते गड्या, चल, कां उशीर, लवकर फार ... ध्रु पळ, घटका, तास, दीन, मास, वर्ष, करिती रिण मरण जवळ जवळ येतें, कसा धीर धीर लवकर फिर ... १ बालपण, तारूण्यभर सरुनी होईल वृद्ध घर इंद्रियेही बंद होतां गलीत शरीर, लवकर फिर ... २ छंद, फंद, विषयरंग, आणिक करसी फार ढंग जगिक सुखी गुंगु नको, लागेल तरी, लवकर फिर ... ३ तीर्थ, वारी, स्नान, दान करुनि म्हणसी पुण्यवान आंत घाण येति सारी, वर केला पीर लवकर फिर ... ४ सद्गुरू ख्रिस्तेचं, जाण, पाप्यास्तव दिला प्राण तारण करील म्हणून ठेवीं तात्पदी शिर, लवकर फिर ... ५ ---- कृ. र. सांगळे