६२२. चाललेली घटिका

मराठी

६२२. चाललेली घटिका चालली घटिका, कर विचार हिचा आधीं ... ध्रु जीवन म्हणजे घडी आतांचि, खाणं तुझ्या हि अस्तित्वाची सुखदुःखाची अनुभूतीची संधी हि साधी, कर विचार हिचा आधीं ... १ श्रुद्धि वृद्धी विक्रम, कीर्ती, सुख, संपत्ती, भुक्ति, मुक्ती हीच घडी निजहृदयिं धरिती हीच तुज बोधी कर विचार माझा आधीं ... २ गेली घडी, हें स्वप्नच झालें पुढची, मृगजळ पुढतीं ठेलें खरे तुझ्या जें हातीं आलें पदरीं तें बांधी कर विचार त्याचा आधीं ... ३ सत्कार्यी जरी गेली घडी हीं, स्वप्न मागचें तरी सुखदायि, आशामय मग पुढचें पाहीं, सोड रे धुंदी कर विचार ह्याचा आधीं ... ४ ---- ना. वा. टिळक