मराठी
६२३. जीविताची गुरुकिल्ली
हि क्षणिक धनाची छाया
स्वप्नातील सृष्टी वायां, जाण रे ... ध्रु
जें दिसे रम्य देखाया
तें अवघे जाणें विलया, जाण रे
तव ज्ञान असो अज्ञान, दिसे मज जाण
प्रभूवीण वाया, प्रभूवीण वाया,
वस्तूवीण जैशी छाया, जाण रे ... १
मी राजा, पंडित जगतीं,
मी थोर सुखी, हि भ्रांती जाण रे,
सुख कसें नाशवंतास म्हणावे खास
बुदबुदि कोठें, बुदबुदि कोठें,
बुडविले वाजिगज मोठे सांग रे ... २
तुन पाय धरी ईशाचे
हें सौख्य जगिं ह्या साचें, जाण रे
हें सौख्य खरें अविनाशी हरिना ज्यासी
काल जग कोणी, काल जग कोणी,
रम सदा प्रभूच्या चरणीं ऐक रे ... ३
------ भा. कृ. उजगरे