मराठी
६२४. भक्ताचा मृत्यू
देवभक्त हा सुखे निजला,
ख्रिस्तामाजी विजयी झाला
दुःखद जगता टाकुनी गेलला
सुरम्य स्थानाला ... १
अळवी लोकां प्रेमानेंची,
गोडी लावी प्रभुवचनाची,
बोधामृते सर्व मनाची,
दुःखे वारीतसे ... २
निशिदिनी प्रभूचें भजन करोनि
होई त्यासी येशूवाणी,
हर्षाने ती मान्य करोनि,
कुरकुर करी न कधीं ... ३
ऐसा घालुनी कित्ता त्याने
मोह जिंकिलें प्रभुशक्तीने,
तैसा आमहीं विश्वासाने
ख्रिस्तपथी जावें ... ४
दिव्यासनीं तो वीणा घेउनी,
प्रभू ख्रिस्ताचा महिमा गाउनी,
मार्गप्रतिक्षा अमुची करुनि
वसतो सुखस्थानीं ... ५
---- सु. वि. करमरकर