मराठी
६२६. ख्रिस्ती भगिनीचा मृत्यू
जाशी सोडूनि भगिनी,
हि नेत्रे अमुची ओली अजुनी ... ध्रु
जाशी प्रियाच्या सदनीं
तूं घ्याशीं ज्याचे पद दिनरजनी ... १
अशनी, पानीं, शयनी,
तुज येशू दिसे मनीं, जनीं वा विजनि ... २
खांब तयाचा धरुनी
तूं आलीस गेलीस यात्रा करुनि ... ३
धन्य प्रभू उचलोनि
तुज नेई मृत्यूच्या घन दारितोनि ... ४
ह्या उपकारा स्मरुनी
आम्ही लिन प्रभूच्या निर्मल चरणी ... ५
---- ना. वा. टिळक