६२८. मरणावर जय

मराठी

६२८. मरणावर जय जिंकूनि मरणाला, मरणाला जीव कुडींतून गेला ... ध्रु अक्षयतेचा अधिकारी हा इकडून तिकडे झाला ... १ विश्वासाचा जिना चढोनि दिव्य मंदिरी शिरला ... २ मेला नाहीं निजला क्षणभर पुन्हा सुखाने उठला ... ३ प्रभूने त्याला किती दयेने अजरामर हो केला ... ४ ---- ना. वा. टिळक