६२९. आयुष्याची त्वरित गती

मराठी

६२९. आयुष्याची त्वरित गती सूर्य फेऱ्या घालितां गेलें वर्ष संपलें, तों असंख्य मरुनी परलोकीं चालले ते जगाला सोडूनि सौख्य पावले कीं हाल, आम्ही मर्त्यभुवनी राहतों थोडांचं काळ ... १ जैसा बाण सुटतां उडतों अधांतरीं, जैशी वीज लावतां चमक दिगंतरी तैशी आयुष्याची वेळ मोठ्या वेगें संपुनि स्वप्नावाणी गुजरेल पाबळें करुनि ... २ ईश्वराचे उपकार आम्ही आतां मानितों, केलीं पातकें अपार, परंतू, क्षमा मागतों देवा आम्हां दे सद्भाव, ख्रिस्तप्रिती दाखवीं, अंती दावी तू कृपा, स्वर्गलोकीं पोंचवि ... ३ ------ एच. ब्लेंटाईन