६३०. त्वरित संपणारे आयुष्य

मराठी

६३०. त्वरित संपणारे आयुष्य आयुष्य वेगें पळते, कां हो न तें पळावें मेघ तसें तें सरते, त्यासाठीं न रडावे ... १ आमहीं उभे हो असतां यार्देन नदीच्या तीरी कांठ पुढारा दिसतो प्रकाशित, सोनेरी ... ध्रु हा प्रभू गेला सांगुनी कीं जागृत असावें बोध तयाचा स्मरुनी जाण्यास सिद्ध व्हावे ... २ संकटें दुःखें वरिती तैं धैर्य न सुटावे, ख्रिस्त प्रभूची वचणे देती अभय ठावें ... ३ संबंध सारे तुटले, प्रशांत मन ठेवूं , जावुत प्रिय सगळे, स्वर्गी भेटुनी सेवूं ... ४ ---- मेरी ई. बिसल