मराठी
६३२. ख्रिस्ती बंधूचा मृत्यू
बंधू आमुचा निजे,
टाकी देह्भाराला,
देवप्रांती जाउनी
पावे सौख्यशांतीला
पापभीती जावोनि
सौख्यधामीं तो राहे,
दुःख अस्त होऊनि
जोडी सिद्धी तो, पाहे ... १
धाव मारुनी धीरे
दिव्य हार जिंकिला
युद्धि सिद्धी पावुनी
तो कृतार्थ जाहला
दिव्य दूत येऊनि
नेती त्याजला वरीं
स्वर्गगेहीं पोंचूनि
तो रमे स्तुतिस्वरी ... २
---- एमिली आर. बिसल