मराठी
६३३. शेवटला न्याय
प्रभू हा उतरून
मृतांस उठवील,
कोणालाही न वगळून
तो न्याय ठरविलं ... १
त्या दिवशी सरेल
हि पृथ्वी आकाश
जीवात्मा किती घाबरेल
कसा चुकेल नाश ... २
आतां कानावरी
सुवार्ता पडते,
शास्त्राने कृपा ईश्वरी
सर्वाना कळते ... ३
पाप्यानो कृपा घ्या,
कां नाश पावतां
आश्रय पावायास या,
येशू हा तारिता ... ४
मिळा हो त्याजशी
प्रभूचे लागो प्रेम,
त्या घोर नायदिवशी
तो करी तुमचे क्षेम ... ५
------ एच. ब्लेंटाईन