६३४. ख्रिस्ताचे पुनरागमन

मराठी

६३४. ख्रिस्ताचे पुनरागमन येशू मेघारूड येई तेज:पुंज गौरवी, लाखो गाती त्यासभोती घोषनाद मनस्वी, हालेलूया येशू राजा वैभवी ... १ सारीं राष्ट्रें तैं पहाती त्या प्रतापी येशूला, ज्यांही खिळिलें क्रुसाशी तारका पवित्राला पाहूनियां येई पाणी लोचना ... २ येशू राजा येऊनियां अंत्य न्याय तुं करीं सारी सत्ता घेउनियां दावी शक्ती हि खरीं ये त्वरेने, लावी शत्रूंना दुरी ... ३ ---- एमिली आर. बिसल