६३५. अविनाशी सुख

मराठी

६३५. अविनाशी सुख अविनाशी सुख तें मज पामराला प्रभू देई, तर शोक करुं मी कशाला ... ध्रु स्वर्गीं नसे दुःख, मरणाची वार्ता, परी प्रीती, सुख, शांती प्रभूची मनाला .. १ तेथें तहान, भूक लागे न काहीं, परी प्रीती प्रभू ह्याच संजीवनाला ... २ प्रिय पाडसें सारी जीं नेलीं त्याने तीं सर्व सुखरूप देईल मला ... ३ प्रभू हस्त पसरोनी सद्भक्त येता धावुनी मिठी मार त्यांच्या गळ्याला ... ४ प्रेमें ऐकती भक्त जी मधुर वाणी, आहा कसें वर्णू प्रभुदर्शनाला ... ५ सद्भक्त, गणदूत गाती आनंदें न्याहाळितां प्रिय प्रभूच्या मुखाला ... ६ सदभक्त मुकुटातें काढुनी गाती, जयजय, सुवंदित, नवगीत त्याला ... ७ प्रभू भक्त कवळोनि हृदयासी धरितां आहा नसे पार मग त्या सुखाला ... ८ --- कृ. र. सांगळे